Thursday, September 29, 2011

|| पावसाळा ||


   ||  पावसाळा ||


थंडगार आला वारा ,
ओल्या पावसाच्या गारा ,
फुले मोराचा पिसारा ,
आला अंगी तो शहारा...||१||


निळे पिसारे ते घण,
दाट आले ते भरून,
जीव झाला तो बेभान,
संगे पावसाचे कण....||२||


हिरवीगार झाली राने,
फुले वृक्ष ,वेली,पाने,
कानी पाखराचे गाणे ,
आले नयनी  पहाणे ....||३||


धुंद वाऱ्यासंगे येई ,
गोड मातीचा सुवास ,
सात रंग आले नभी ,
झाले तृप्त आज मन.....||४||


 - - राहुल (७ सप्टेंबर २०११ )


Monday, August 1, 2011

-"(एक अयशस्वी प्रेम)"-

प्रियकर आपल्या मरण पावलेल्या प्रेयसीच्या फ़ोटोकडॆ पाहुन
मनात आलेला दुख्ररुपी विचार.................................

-"(एक अयशस्वी प्रेम)"-

खुप दिवसानंतर  जेव्हा,ती मला भेट्ली,
आठवणी होत्या त्याच,फ़क्त वेळ होती सरली,

बघता बघता तिची नजर,जेव्हा नजरेला जुळ्ली,
क्षणभर वर पाहुन,माझी मानच खाली वळली,

डोळे आले भरुन,भरुन अश्रु आले अकाली,
कारण गेले होते तिचे प्राण गेल्या पहाटेच सकाळी,

आठवते मला दुखात माझ्या तिच होती धावली,
अस्तित्वच तिचे नाहिशे झाले,पण उरली आठ्वणीची सावली,

दुखच होते मनात, तशी वेळ्च होती आली,
होते संपले सगळे काही,पण किंमत प्रेमाची मात्र कळाली...................

- राहुल( २००८ मार्च २३)