Friday, December 24, 2010

जीवन - एक प्रवास



जीवन - एक प्रवास

जीवन हा एक प्रवास आहे,
हे जाणायला तू उशीर करू नकोस,
सुख : दुःख
तर असतीलच सोबत,
मधेच मात्र तू कधी
थांबू  नकोस.............

आत्मविश्वास आणि आशीर्वाद ,
त्यांना सोबत घ्यायला तू विसरु नकोस,
जमेल तेवढे तू प्रयत्न कर,
पण मागे वळायचा विचार तु मनी आणु नकोस............


चुकुन अपयश आलेच जर कधी,
हिमंत मात्र तू सोडू नकोस,
पडले यश पदरी तर
कधी,माजून मात्र तू जाऊ नकोस ..................
डोळ्यातील स्वप्न पुर्ण करायचे असेल,
तर हात धरून तू बसु नकोस ,
कष्टाविना या जगात फ़ळ नाही,
हे मात्र तू कधी विसरु नकोस............

जीवनात किती क्षण उरलेत,
याचा विचार तू कधी करू नकोस,
प्रत्येक क्षणात किती जीवन आहे,
याचा विसर तू पडू देवू नकोस...............

जीवन हा एक प्रवास आहे,
हे जाणायला तू उशीर करू नकोस................!!



- राहुल (२३ डिसेबर २०१०)


 

आठवण तुझी ..............

आठवण तुझी ..............

आज काहीतरी हरवल्यासारखे वाटले,
तुझी आठवण आल्यानतर,
सभोवताली शणभर शात वाटले,
तुझी चाहुल लागल्यानतर..........................॥१॥



झोपेत जागे रहावेसे वाटले,
स्वपनात तुला पाहिल्यानतर,
श्वासात श्वास गुतुन राहीले,
तुझी वाट पाहिल्यानतर............................. ||२||


मनात थोड़ी गड़बड़ उडाली,
डोळ्यात तुझ्या पाहिल्यानंतर,
ठेस मात्र जोरात लागली ,
शब्दात तुझ्या अड़खळ्यानंतर............||३||


पुन्हा काहीतरी हरवल्यासारखे वाटले,
तू अदृश्य झाल्यानंतर,
मग मात्र मी जाणले ,
होते आपल्यात खुप अंतर .................||४||


ह्रदय भरून आल्यासारखे वाटले,
स्वप्नातून जागे झाल्यानंतर,
जीवन थाबल्यासारखे वाटले,
साथ तुझी नसल्यानंतर................||५||


शणभर मन अवाक् झाले ,
निर्णय तुझा एकल्यानंतर,
उरले फक्त मैत्रीचे नाते,
माझ्या त्या पोरकया प्रेमानंतर.........||६||




- राहुल (२३ डिसेबर २०१०)