Monday, August 2, 2010

---[प्रेयसी]---

---[प्रेयसी ]---

काय सांगू तुझ्याबदद्ल,
माझे मलाच कळत नाही,
बोलायचे असते खुप मला,
पण बोलायला मात्र जमत नाही......!

तुझा चेहरा जणु,
उगवत्या सुर्याची आठवण,
तुझा सहवास जणु,
अनमोल क्षणांची साठवण........!

तुझे बोलणे जणु,
चिमुकल्या पाखराचे गाणे,
तुझे हसणे जणु.
ग्रीष्मात वसंताचे येणे......!

तुझे डोळे जणु,
अथांग भावनाचा सागर,
तुझी नज़र जणु,
त्या सागरातीलच एक लहर......!

तुझे केस जणू ,
माझ्या दुखांची सावली ,
तुझे ओंठ जणू ,
जीवनातील मधाळ क्षणांची साक्ष ....!

तुझे मन जणु,
ओजळ असंख्य स्वप्नाची,
तुझे स्वप्न जणु,
ओढ उज्जवल यशाची.......!

काय
सांगू तुझ्याबदद्ल,
माझे मलाच कळत नाही,
वर्णन करता करता तुझे,
शब्दच माझे पुरत नाही......!

शब्दच माझे पुरत नाही......!


- राहुल (०६ मे २०१२ )

का ह्यालाच प्रेम म्हणतात?




कधी दुर दुर असतेस,
तर कधी अचानकच समोर येतेस,
नजरेला नजर भिड्ते आणि,
अचानकच ओठ शिवले जातात,

त्यानंतर सुरु होतो,
तो म्हणजे नजरेचा सवांद,

का ह्यालाच प्रेम म्हणतात?

गर्दीतही एकटेपणा वाट्तो,
गोंधळातही फ़क्त एकच आवाज कानी पड्तो,
सभोवताली फ़क्त एकच चेहरा दिसतो,
तु नसतानाही तु असल्याचा भास होतो,

का ह्यालाच प्रेम म्हणतात?

पहिल्यांदा जेव्हा पाहिले तुला,
तो क्षण तर आजही आठवतोय,
त्या क्षणा च्या आठ्वणीने तर,
माझा प्रत्येक
क्षण मजेत जातोय,

का ह्यालाच प्रेम म्हणतात?

का ह्यालाच प्रेम म्हणतात?

होय,तर नक्कीच मी प्रेमात पड्लोय,

आता,आता फ़कत एकच ध्यास जीवनात,
मिळवायचा तो फ़क्त तुझाच सहवास,

पण करावा लागेल विचार थोडा यासाठी मला,
सांगावे लागेल सर्व काही मनातले फ़क्त तिला..!!

- राहुल बनसोडे ( १ मार्च २००८ )

Sunday, August 1, 2010

दिवस ते "ENGINEERING" चे

***********दिवस ते "ENGINEERING" चे*************

थकलेल मन घेउन जेव्हा जायचो आम्ही कॉलेजात ,
"कॅम्पस" मधले पाखरे पाहुन फ़ड्फ़डायचे फ़ार मनात;

शिक्षक सगळे
कॉलेजमधले बोलायचे पुस्तक का,
पण
कॉलेजमध्ये येऊन आम्ही फ़क्त झोपा काढायचो गाढ ;

झोपलेल्या मनात, मनातल्या स्वपनात जेव्हा पाहायचो मी तिला,
ऎकच प्रश्न पडायचा मनात कधी म्हणेल का ती हो मला?;

सगळे काही विसरुन फ़क्त लिहायच्या ताणुन ASSIGNMENTS,
त्या लिहीतानाही मनात राहायच्या पोरीबददलच्या SENTIMENTS;

उरल्या-सुरल्या दिवसात आता ठरविले आठवणीना कोरायचे,
पण विसरुनही कधी विसरु शकणार नाही,दिवस ते "
ENGINEERING" चे;    

- राहुल and रोहन(in sem 5)

-------[कुणीतरी असाव आपलही]------

-------[कुणीतरी असाव आपलही]------


कुणीतरी असाव आपलही,
पापण्यावर अश्रु घेऊन,
खांद्यावर  डोके ठेवुन,
मन मोकळ करायला....

कुणीतरी असाव आपलही,
सोबत जिच्या राहुन,
क्षनोक्षनी थाबुन,
सुख:दुख उपभोगायला......

कुणीतरी असाव आपलही
संकटी  धावुन यायला,
चुकीचे करताना काही,
हात धरुन थांबवायला ......

कुणीतरी असाव आपलही,
योग्य मार्ग सुचवायला,
आयुष्यभर संगे  राहायला आणि
अखेरपर्यंत  साथ दयायला...........


- राहुल(१९ मार्च २००८)