Wednesday, October 24, 2012

[ साथ तू देशील का ? ]



माझ्या कवितेतील शब्दांना ,
समजून तू घेशील का ?
मनातील सर्व भावनांना ,
एकूण तू घेशील का ?


माझ्या नयनातील सागराचा ,
किनारा तू बनशील का ?
मनातील प्रत्येक स्वप्न ,
तू , अस्तित्वात आणशील का ?


जीवनातील प्रत्येक सुखाचे ,
कारण तू बनशील का ?
दु:खात असेलच जर मी कधी ,
तर डोळे माझे पुसशील का ?


हृदयातील प्रत्येक ठोक्याचा (स्पंदनाचा ),
श्वास तू बनशील का ?
थोडासा विचार करून माझ्यासंगे ,
एक छानसे घरटे सजवशील का ?


स्वप्न म्हणून जगात आहे ,
जीवनात तू येशील का ?
आयुष्यातील अखेरच्या
क्षणापर्यंत ,
साथ तू देशील का ?
साथ तू देशील का ?


            -  राहुल

No comments:

Post a Comment