जीवन - एक प्रवास
जीवन हा एक प्रवास आहे,
हे जाणायला तू उशीर करू नकोस,
सुख : दुःख तर असतीलच सोबत,
मधेच मात्र तू कधी थांबू नकोस.............
आत्मविश्वास आणि आशीर्वाद ,त्यांना सोबत घ्यायला तू विसरु नकोस,
जमेल तेवढे तू प्रयत्न कर,
पण मागे वळायचा विचार तु मनी आणु नकोस............
चुकुन अपयश आलेच जर कधी,हिमंत मात्र तू सोडू नकोस,
पडले यश पदरी तर कधी,माजून मात्र तू जाऊ नकोस ..................
डोळ्यातील स्वप्न पुर्ण करायचे असेल,
तर हात धरून तू बसु नकोस ,
कष्टाविना या जगात फ़ळ नाही,
हे मात्र तू कधी विसरु नकोस............
जीवनात किती क्षण उरलेत,
याचा विचार तू कधी करू नकोस,
प्रत्येक क्षणात किती जीवन आहे,
याचा विसर तू पडू देवू नकोस...............
जीवन हा एक प्रवास आहे,
हे जाणायला तू उशीर करू नकोस................!!
- राहुल (२३ डिसेबर २०१०)
Poem is in Process...........
ReplyDelete