आठवण तुझी ..............
आज काहीतरी हरवल्यासारखे वाटले,
तुझी आठवण आल्यानतर,
सभोवताली शणभर शात वाटले,
तुझी चाहुल लागल्यानतर..........................॥१॥
झोपेत जागे रहावेसे वाटले,
स्वपनात तुला पाहिल्यानतर,
श्वासात श्वास गुतुन राहीले,
तुझी वाट पाहिल्यानतर............................. ||२||
मनात थोड़ी गड़बड़ उडाली,
डोळ्यात तुझ्या पाहिल्यानंतर,
ठेस मात्र जोरात लागली ,
शब्दात तुझ्या अड़खळ्यानंतर............||३||
पुन्हा काहीतरी हरवल्यासारखे वाटले,
तू अदृश्य झाल्यानंतर,
मग मात्र मी जाणले ,
होते आपल्यात खुप अंतर .................||४||
ह्रदय भरून आल्यासारखे वाटले,
स्वप्नातून जागे झाल्यानंतर,
जीवन थाबल्यासारखे वाटले,
साथ तुझी नसल्यानंतर................||५||
शणभर मन अवाक् झाले ,
निर्णय तुझा एकल्यानंतर,
उरले फक्त मैत्रीचे नाते,
माझ्या त्या पोरकया प्रेमानंतर.........||६||
- राहुल (२३ डिसेबर २०१०)
No comments:
Post a Comment